नवीन शैक्षणिक धोरणावर संघाच्या विचारांचा प्रभाव   

सोनिया गांधी यांची जोरदार टीका

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणावर काँग्रेसच्या नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार सोनिया गांधी यांनी सोमवारी जोरदार टीका केली. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शैक्षणिक धोरणे या निमित्ताने राबविली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
केंद्रीकरण, व्यापारीकरण आणि धार्मीकतेकडे झुकणारे नवे शैक्षणिक धोरण असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे, अशी भिती व्यक्त करुन सोनिया म्हणाल्या, या सरकारने गेल्या वर्षभरापासून शिक्षण मंडळाची बैठक बोलावलेली नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी संबंधित मोठ्या बदलांबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारांशी एकदाही चर्चा केली नाही. राज्य सरकारांवर दबाव आणणे, केंद्र सरकारचा निधी रोखणे, असे प्रकार मात्र केले, असा आरोप त्यांनी केला. 
 
भाजप आणि संघाने स्वतःच्या फायद्यासाठी शैक्षणिक संस्थांचे खासगीकरण केले असून, नागरिकांवर खासगी शिक्षण संस्था लादल्या आहेत, गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकार असे धोरण राबवत आहे, असा आरोप त्यांनी केला.

Related Articles